संत्रा फळबाग मृग बहारसाठी एकच दिवस पोर्टल खुले

संत्रा फळबाग मृग बहारसाठी एकच दिवस पोर्टल खुले

अकोट तालुका प्रतिनिधी

अकोला जिल्ह्यात प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंमलबजावणीतून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचा

धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.फळबाग संत्रा मृग बहार आणि लिंबू पिकांसाठी विमा

Related News

अर्ज भरण्यासाठी केवळ एका दिवसासाठीच पोर्टल खुलं ठेवल्यामुळे हजारो शेतकरी विम्याच्या कवचापासून वंचित राहिले आहेत.

दिनांक १३ जून २०२५ रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून

दिनांक १४ जून हीच अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्याचे कळवले आहे.

या आदेशानंतर अवघ्या 24 तासांच्या आत संपूर्ण अर्ज प्रक्रियेची जबाबदारी शेतकऱ्यांवर टाकण्यात आली.

यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर व मनशुद्धीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

अकोट तालुक्यातील अकोलखेड,पणज,उमरा,या तीनही मंडळांमध्ये संत्रा पिकासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री

फसल विमा योजना राबवली जाते आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी याचा दरवर्षी लाभ घेतात.

मात्र यावर्षी संपूर्ण योजनेला नियोजनाचा अभाव,तांत्रिक अडथळे व वेळेची कमी सूचना यामुळे तडे गेले आहेत.

दिनांक १४ जून रोजी अकोट तालुक्यातील अनेक गावांमधून शेतकरी CSC सेतु केंद्रांवर अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने जमले होते.

मात्र एकाच दिवशी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे केंद्रांवर तांत्रिक अडथळे निर्माण झाले.व पोर्टल सतत ‘एरर’ दाखवत होते

आणि अनेक ठिकाणी एकही अर्ज सबमिट होऊ शकला नाही.दुपारी चार वाजेपर्यंत हीच स्थिती कायम राहिली.

दिनांक १५ जून रोजी अर्ज भरण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना पोर्टलवर “दिनांक १४ जून ही अंतिम तारीख होती”

असा स्पष्ट संदेश दाखवण्यात आला. म्हणजेच केवळ एका दिवसासाठी पोर्टल उघडून प्रशासनाने शेतकऱ्यांची अक्षरशः

थट्टा केल्याचे स्पष्ट होते.या गंभीर प्रकारामुळे संत्रा उत्पादक फळबाग हजारो शेतकरी विमा संरक्षणापासून वंचित

राहिले असून शासनाच्या एकतर्फी निर्णयामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता आहे.यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये

तीव्र संताप असून पोर्टल पुन्हा सुरू करून अर्ज करण्याची संधी द्यावी अशी मागणी शेतकऱ्या कडून होत आहे.एक दिवसाचा

अल्प सूचनाकाल,तांत्रिक अडचणी आणि अनुत्तरदायी नियोजन या साऱ्यामुळे ही योजना शेतकऱ्यांच्या हिताच्या पूर्णपणे विरोधात गेली आहे.

शासनाने या प्रकाराची तातडीने दखल घ्यावी अन्यथा शेतकऱ्यांमध्ये असंतोष तीव्र होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

प्रतिक्रिया

संत्रा मृग बहार विमा भरण्यासाठी पोर्टलवर फक्त एक दिवस देण्यात आल्याने बहुतांश शेतकरी विम्याच्या पासून वंचित राहले आहेत.

रविंद्र देवराव घोरड

संत्रा उत्पादक शेतकरी रामापूर.

प्रतिक्रिया

सरकारने आम्हाला लवकरात लवकर मृग बहार विमा भरण्याची तारीख वाढवून द्यावी.

जेणे करून आम्हाला विमा भरता येईल.

शिरीष महाले

संत्रा उत्पादक शेतकरी शिवपुर.

Read Also : https://ajinkyabharat.com/jalasandharan-minister-sanjay-rathod-yanchayakdoon-jakhmani-vicharpus/

Related News