बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरण: अकोल्यात जन आक्रोश मोर्चा

बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरण: अकोल्यात जन आक्रोश मोर्चा

अकोला: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणी येथे पोलिस कोठडीत झालेल्या

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ आज अकोल्यात सर्वधर्मीय व सर्वपक्षीय संघटनांतर्फे जन आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे.

या मोर्चाचे नेतृत्व वैभवी संतोष देशमुख, आमदार सुरेश धस, आणि मराठा योद्धा मनोज जरांगे करत आहेत.

Related News

दुपारी २ वाजता अशोक वाटिका परिसरातून सुरू होणारा हा मोर्चा सर्वोपचार रुग्णालय व सार्वजनिक

बांधकाम कार्यालयासमोरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

मुख्य मागण्या:

  1. दोन्ही प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई.
  2. अमानुष घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन.
  3. निषेधाच्या चिन्ह म्हणून काळे झेंडे दाखवून विरोध.

या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत असून, उपस्थित मार्गदर्शकांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/maratha-workers-show-black-flags-to-deported-deputy-chief-minister-ajit-pawar/

Related News