मंत्रिमंडळ विस्तार करा : संजय शिरसाट

केंद्रातील

केंद्रातील मोदी सरकारने शिंदे मंत्रिमंडळ विस्ताराला रेड सिग्नल दिला आहे.

निवडणुकीला तीन महिने शिल्लक असल्याने केंद्र सरकारने

मंत्रिमंडळ विस्तार करण्याऐवजी ते जसेच्या तसे चालू द्या,

Related News

असा स्पष्ट संदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

विधानसभेच्या तोंडावर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार अशी धाकधूक

युतीतील आमदारांना लागून राहिली आहे.

जानेवारीपासून मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याचे तर्क वितर्क

मांडले जात आहेत मात्र जून संपला तरी अजून मंत्रिमंडळ विस्तार होईल

अशी काही चिन्हे दिसून येत नाहीत.

अशातच सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीतून मंत्रिमंडळ विस्तार

विधानसभेच्या तोंडावर न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे.

मध्यंतरी शिंदे आणि अजित पवार दिल्लीवारीला गेल्याचे आढळून आले होते

याच दरम्यान मंत्रिमंडळांचा विस्तार करु नये असा आदेश

युती सरकारला दिल्लीतून दिल्याचे कळत आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर दिलेल्या प्रतिक्रियेत

युतीतील नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्तार केला पाहिजे

अन्यथा युतीतील आमदार नाराज होतील असे विधान केले होते.

अशातच आता दिल्लीच्या आदेशावरुन राज्यात मंत्रिमंडळ विस्तार न करण्याचे

युतीतील नेत्यांनी ठरवल्याचे कळते.

Read also: https://ajinkyabharat.com/donald-trump-formally-accepts-nomination-as-official-candidate-today/

Related News