देवेंद्र फडणवीसांना अटक करा! संजय राऊतांची मागणी

विधान

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या

३ उमेदवारांपैकी एकाचा पराभव झाला.

या निवडणुकीत मविआची काही मते फुटली असा अंदाज आहे.

Related News

त्यात देवेंद्र फडणवीसांनी मविआचे २० आमदार महायुतीकडे आल्याने

त्यांचा फुगा फुटला असं विधान केले.

त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधत

देवेंद्र फडणवीसांच्या अटकेची मागणी केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, तुमचा भ्रष्टाचार, तुमचा पक्ष आणि हे सरकार भ्रष्टाचारातून आलेले आहे.

पैसा फेको, तमाशा देखो असं आहे.

देवेंद्र फडणवीस बोलतात महाविकास आघाडीचे २० आमदार फोडले,

हे चिंचोके देऊन फोडले का?,

केंद्रीय गृहमंत्र्यांना भ्रष्टाचार नकोय ना, मग देवेंद्र फडणवीसांना अटक करा.

२० आमदार फोडले, फडणवीसांनी किती पैसे दिले,

ईडी, सीबीआय चौकशी फडणवीसांच्या मागे लावा.

तुम्ही सच्चे असाल ना, पहिली चौकशी देवेंद्र फडणवीसांची करा

असं राऊतांनी अमित शाहांना आव्हान केले.

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडली.

या निवडणुकीत महायुतीने ९ उमेदवार दिले होते

तर मविआकडून ३ उमेदवार रिंगणात होते.

मविआत काँग्रेसकडून १, ठाकरे गटाकडून १ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं

शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता.

तर महायुतीने पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरख,

सदाभाऊ खोत यांना भाजपाने उमेदवारी दिली.

एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाने प्रत्येकी २ उमेदवार उभे केले.

लोकसभेचा निकाल पाहता महायुतीची मते फुटतील

असा दावा मविआकडून वर्तवला जात होता.

परंतु या निवडणुकीत मविआचेच काही आमदार फुटल्याचे समोर आले.

त्यावरून आता फडणवीस-राऊतांमध्ये शाब्दिक संघर्ष पाहायला मिळाला.

Read also: https://ajinkyabharat.com/take-care-of-dengue-heat-health/

Related News