संजय राऊतांचा फोटो थेट रेड्याच्या गळ्यात, शिंदेंच्या शिवसेनेचं कुठं अनोखं आंदोलन?

संजय राऊतांचा फोटो थेट रेड्याच्या गळ्यात, शिंदेंच्या शिवसेनेचं कुठं अनोखं आंदोलन?

जळगाव – ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याबाबत

आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ जळगावमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेने अनोखे आंदोलन केले.

या आंदोलनात कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या फोटोला रेड्याच्या

Related News

गळ्यात टांगले आणि त्याला काही अंतरपर्यंत मिरवत निषेध व्यक्त केला.

राऊतांच्या विधानांचा निषेध

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत एक पद मिळवण्यासाठी

दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असा खळबळजनक दावा शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केला होता.

त्यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. संजय राऊत यांनी नीलम

गोऱ्हे यांच्यावर निशाणा साधत त्यांना “निर्लज्ज आणि विकृत बाई” असे संबोधले.

यावरून आता शिंदे गटही आक्रमक झाला असून त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

शिंदे गटाच्या शिवसेनेचा विरोध

राऊतांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ जळगावातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या

प्रतिमेला रेड्याच्या गळ्यात टांगून निषेध नोंदवला. या आंदोलनात मोठ्या संख्येने

कार्यकर्ते सहभागी झाले होते. घोषणाबाजी करत राऊतांच्या विधानाचा विरोध करण्यात आला.

राजकीय वातावरण तापले

या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून

आला असून पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read more news here : https://ajinkyabharat.com/trimbakeshwar-temple-prajakta-malichya-program-program-archaeological-department/

Related News