अकोला मध्ये दिव्यांगांसाठी जयपूर फूट वितरण कार्यक्रमात संगीताच्या जादूने श्रोते मंत्रमुग्ध
अकोला – स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या जयपूर फूट वितरण कार्यक्रमात
सामाजिक उपक्रमांची प्रेरणा सर्वत्र पसरली. २१ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे लायन्स क्लब सुप्रीम पुणे आणि इंडियन रेड क्रॉस
सोसायटी अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांना जयपूर फूट आणि विविध साहित्याचे वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमात श्री. शिवाजी महाविद्यालयाचे डॉ. विशाल कोरडे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली
“हमको मन की शक्ती देना, श्रद्धा विश्वास की भक्ति देना” हे प्रेरणा गीत दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या सदस्यांनी सादर केले.
गीताला सहगायन अनामिका देशपांडे, अस्मिता मिश्रा आणि तन्वी दळवे यांनी केले, तर बासरीची साथ पंडित हरिप्रसाद
चौरसियांच्या विद्यार्थिनी डॉ. मोना तिडके, तबल्याची साथ ओम वैद्य यांनी दिली. तांत्रिक सहाय्य गणेश सोळंके यांनी केले.
कार्यक्रमाला अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ऍडव्होकेट आकाश फुंडकर, आमदार वसंतराव खंडेलवाल, हरीश पिंपळे, आमदार रणधीर सावरकर,
डॉ. किशोर मालोकार यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. विशाल कोरडे यांच्या प्रेरणा गीताला श्रोत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.
आयोजन समितीने डॉ. विशाल कोरडे आणि दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या सदस्यांचा सत्कार करून कार्यक्रमाचा समारोप केला.
हा उपक्रम समाजातील एकतेची आणि दिव्यांग बांधवांसाठी दिलेल्या प्रेरणेची अनमोल उदाहरण ठरला.
Read also : https://ajinkyabharat.com/sinhagad-tanaji-kadyavaron-tourist-bapatta/