समोरासमोरच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

समोरासमोरच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

बाळापूर (प्रतिनिधी):

वाडेगाव-बाळापूर मार्गावर दुचाकी आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात

शेळद गावातील किसन डोंगरे (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला.

Related News

ही दुर्घटना १० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, डोंगरे हे वाडेगाव येथील एका हॉटेलवर वस्ताद म्हणून कार्यरत होते.

अपघाताच्या दिवशी ते (एमएच ३० एपी ५९५१) क्रमांकाच्या दुचाकीवरून वाडेगावकडे जात असताना,

समोरून भरधाव येणाऱ्या (एमपी १३ १२८६) क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडकेची तीव्रता इतकी होती की डोंगरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या प्रकरणी बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Related News