समस्तीपूरमध्ये सात लाखांची लूट, दोन भावांवर गोळीबार;

समस्तीपूरमध्ये सात लाखांची लूट, दोन भावांवर गोळीबार;

बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात रविवारी सायंकाळी भीषण लूट आणि हिंसक घटना घडली.

चार सशस्त्र लुटेऱ्यांनी एका किराणा दुकानावर धाड टाकून सात लाख रुपये लुटले,

ग्राहकांवर हल्ला केला आणि नंतर पळताना दोन सख्ख्या भावांवर गोळीबार केला.

Related News

यानंतर संतप्त जमावाने चारपैकी दोन लुटेऱ्यांना पकडून ठोठावून ठार मारले,

तर उर्वरित दोन आरोपी लुटलेली रक्कम घेऊन पसार झाले.

काय घडलं नेमकं?

ही घटना दलसिंहसराय पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सरदारगंज येथील आनंद किराणा स्टोअरवर घडली.

सायंकाळच्या वेळेस चार बाईकस्वार लुटेरे दुकानात शिरले. त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत

सुमारे सात लाखांची रोकड लुटली. या दरम्यान, दुकानात असलेल्या ग्राहकांवरही त्यांनी हल्ला केला.

पळ काढताना लुटेऱ्यांनी अभिषेक आनंद (48) आणि अनुराग आनंद (45) या दोन भावांवर गोळीबार केला.

अभिषेक यांच्या छातीवर, तर अनुराग यांच्या मांडीवर गोळी लागली.

जखमींना तातडीने स्थानिक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले व पुढील उपचारासाठी बेगूसरायला हलवण्यात आले.

जमावाचा संताप, दोन लुटेऱ्यांना ठोठावून ठार

लुटेर्यांचे हे कृत्य पाहून परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत चारपैकी दोन लुटेऱ्यांचा

पाठलाग करून त्यांना पकडलं आणि जोरदार मारहाण करून ठार केलं.

मृत लुटेऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांच्या जवळ कोणतीही ओळख पटवणारी कागदपत्रं सापडलेली नाहीत.

पोलीस तपासात व्यस्त, SIT ची स्थापना

घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून अनेक पोलीस ठाण्यांमधून

अतिरिक्त फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. SP अशोक मिश्रा यांनी माहिती देत सांगितले की,

घटनेच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) गठित करण्यात आलं आहे.

पोलीसांनी घटनास्थळावरून एक गोळी आणि काही रिकामे कारतूस जप्त केले आहेत.

मृत लुटेऱ्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचे फोटो परिसरातील पोलीस स्टेशन,

जिल्ह्यांमध्ये आणि सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

SP यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की,

जर कोणाकडे या लुटेऱ्यांबाबत माहिती असेल, तर ती त्वरित पोलिसांना द्यावी.

ही घटना नागरिकांच्या धाडसाचे उदाहरण असली, तरी कायद्याचा बडगा नागरिकांच्या हातात जाऊ नये,

Read Also : https://ajinkyabharat.com/ipl-2025-playoffsathi-do-or-die-against-mumbai-against-mumbai/

Related News