समर्थ रामदास स्वामी स्थापन रुद्र देवरण मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात संपन्न

समर्थ रामदास स्वामी स्थापन रुद्र देवरण मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात संपन्न

मूर्तिजापूर (प्रतिनिधी)

समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या प्राचीन रुद्र देवरण मारुती मंदिरात यंदाचा

श्री हनुमान जन्मोत्सव अत्यंत उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

Related News

हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला मंदिर परिसरात रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने साजशृंगार करण्यात आला होता,

ज्यामुळे मंदिर परिसर अधिकच मनमोहक आणि भक्तिमय वाटत होता.

हे मंदिर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरापासून अवघ्या ३-४ किलोमीटर अंतरावर,

गावाच्या वेशीवर जंगली भागात वसलेले आहे. “रुद्र देवरण मारुती मंदिर” या नावाने

प्रसिद्ध असलेले हे ठिकाण शेकडो भक्तांचे श्रद्धास्थान आहे.

दर मंगळवार आणि शनिवार या दिवशी येथे विशेष गर्दी असते.

मंदिरात विराजमान असलेली श्री हनुमानाची भव्य, तेजस्वी आणि विक्राळ मूर्ती

अंदाजे ४०० ते ५०० वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींनी स्वतः स्थापन व प्राणप्रतिष्ठित केल्याचे मानले जाते.

ऐतिहासिक आख्यायिकांनुसार, हनुमान भक्तीचा प्रसार करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी

महाराष्ट्रभर मारुती मंदिरे स्थापन केली, आणि त्यातीलच हे मंदिर विशेष मानले जाते.

जयंती निमित्ताने झालेल्या उत्सवात भजन, कीर्तन, महाप्रसाद, पूजन विधी यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

परिसरातील आणि बाहेरून आलेल्या शेकडो भक्तांनी सहभाग घेत, जय श्रीराम आणि जय हनुमानच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला.

Related News