शोभायात्रात मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती
अकोला शहरात अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दुपारच्या वेळी जयंती निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले या मिरवणुकीची सुरुवात सिटी कोतवाली पोलीस स्टेशन चौकापासून करण्यात आली
सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने ही शोभायात्रा काढण्यात आली यावेळी मान्यवरांच्या
हस्ते शोभायात्रेला हिरवी झेंडे देण्यात आली या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने मातंग समाज बांधव सहभागी झाले होते
यावर्षी रॅलीचे स्वरूप भव्य दिव्य दिसून आले ढोल ताशांसह अश्वांचा या शोभायात्रेत सहभाग दिसून आला ढोल
ताशांच्या गजरात नृत्य करीत समाज बांधव मोठ्या उत्साहात सहभागी झाले . सिटी कोतवाली पासून सुरू झालेली ही
शोभायात्रा रेल्वे स्टेशन अण्णाभाऊ साठे चौक येथे पोहोचली या ठिकाणी शोभायात्रेचे समापन करण्यात आले.
Read Also : https://ajinkyabharat.com/akola-district-feminine-sickle-tender-scam/
