अकोला – ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते.या कार्यशाळेत आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी वर्षा मीना, यशदा पुणे येथील प्रशिक्षक तसेच जिल्ह्यातील अधिकारी व ग्रामपंचायत प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात ग्रामपंचायतीच्या कर भरण्यासाठी ऑनलाईन क्यूआर कोडचे अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार मिटकरी यांनी गावागावात पारदर्शक आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीची गरज व्यक्त केली. तर जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी नागरिकांना वेळेत कर भरण्याचे आवाहन केले.यशदाच्या प्रशिक्षक व अधिकाऱ्यांनी अभियानाविषयी सविस्तर सादरीकरण करत ग्रामविकासाची दिशा स्पष्ट केली. या उपक्रमामुळे ग्रामपंचायतींचा कारभार अधिक पारदर्शक, जबाबदार आणि सक्षम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/akolatya-obc-reservation-large-voice/