“सिने दुनियेतील धक्कादायक घटना: आशिष कपूर पुण्यात अटकेत”

“अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप

पुणे – ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतून प्रसिद्ध झालेल्या ४० वर्षीय अभिनेता आशिष कपूरवर एका महिलेनं बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. दिल्लीत ११ ऑगस्ट रोजी महिला यांनी एफआयआर दाखल केली, त्यानंतर पुण्यात पोलिसांनी त्याला अटक केली.

महिलेनं तक्रारीत सांगितलं की, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात आशिष कपूरने दिल्लीतील मित्राच्या घरी आयोजित पार्टीत तिला बाथरूममध्ये नेऊन बलात्कार केला. सुरुवातीला तिने काही इतर लोकांची नावेही नोंदवली होती, पण नंतर फक्त आशिषचं नाव ठेवलं.

मीडिया रिपोर्टनुसार, महिला आणि आशिष इंस्टाग्रामवर एकमेकांशी संपर्कात होते आणि अभिनेत्यानं तिला पार्टीसाठी आमंत्रित केलं होतं. अद्याप पोलिसांना कोणताही व्हिडीओ सापडलेला नाही, जो कथित बलात्काराच्या घटनेचा असेल.

पोलिसांनी सांगितलं की, आशिषच्या हालचालींवर काही काळापासून लक्ष ठेवून अखेर पुण्यातून त्याला ताब्यात घेतलं आहे.

read also : https://ajinkyabharat.com/akolatya-obc-reservation-large-voice/