ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या; नातेवाईकांचा पोलिसांवर गंभीर आरोप

ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या; नातेवाईकांचा पोलिसांवर गंभीर आरोप

अमरावती: उच्च शिक्षण आणि शिकवणी वर्गाच्या अपुऱ्या सुविधा असल्याने अनेक विद्यार्थी शहरात येतात.

असेच मोठी स्वप्ने घेऊन आलेल्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मात्र, या आत्महत्येसाठी पोलिस जबाबदार असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Related News

खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप

शहरातील आकाशवाणी केंद्राच्या मागे जलाराम सोसायटीत राहणाऱ्या 11वीतील विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली.

मृत विद्यार्थ्याचे नाव प्रसन्न वानखडे असून तो बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरचा रहिवासी होता.

प्रसन्न NEET परीक्षेची तयारी करत होता.

प्रसन्नच्या मामाच्या मते, दीड महिन्यांपूर्वी कार्तिक नावाच्या विद्यार्थ्यासोबत झालेल्या वादानंतर, प्रसन्नला खोट्या गुन्ह्यात अडकवले गेले.

या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातील एका तपास अधिकाऱ्याने कारवाई टाळण्यासाठी पैशाची मागणी केली,

परंतु पैसे न दिल्याने प्रसन्नला वारंवार पोलीस ठाण्यात बोलवून मानसिक त्रास दिला गेला.

नातेवाईकांची मागणी – दोषींवर कारवाई करा!

प्रसन्नने पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर आणि खोटी तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

या घटनेने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि पोलिसी मनमानीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read more news here :https://ajinkyabharat.com/shande-yancha-do-or-die-gesture-encroachment-holder/

Related News