कारंजा (लाड) प्रा.सी.पी. शेकुवाले
जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या अध्यक्षतेखाली वाशिम जिल्ह्यातील १० आयडॉल शिक्षकांची
नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये फिटनेस रफ अँड टफ ग्रुपचे सदस्य तथा बाबासाहेब धाबेकर
माध्यमिक विद्यालय यावर्डीचे मुख्याध्यापक विजय देविदास भड यांची आयडॉल शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल ६ ऑगस्ट
रोजी सकाळी साडेसात वाजता फिटनेस रफ अँड टफ ग्रुप तर्फे सत्कार करण्यात आला.
सर्व प्रथम रफ अँड टफ ग्रुपचे फाउंडर मेंबर तथा अध्यक्ष संदीप बर्डे व सचिव जीवन गुंजाटे कोषाध्यक्ष मुकेश रॉय,
शिवाजी गायकवाड यांनी आयडॉल शिक्षक विजय भड यांचा सत्कार केला.
त्यानंतर उर्वरित सर्व सदस्यांनी सुद्धा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
सत्काराला उत्तर देताना विजय भड म्हणाले की सत्कार माणसाच्या जीवनाला प्रेरणा देतात,
त्यामुळे आपण केलेल्या सत्काराने माझे मनोबल वाढले आहे, मी यापुढे यापेक्षाही चांगलं काम करण्याचं प्रयत्न करणार आहे.
असे बोलून रफ अँड टफ ग्रुपचे आभार मानले.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक
रफ अँड टफ ग्रुपचे अध्यक्ष संदीप बर्डे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छंदक आठवले तर आभार प्रा.अनिल मसके यांनी केले.
Read Also : https://ajinkyabharat.com/baykochaya-trasala-kantun-patin-kelly-kelly-suicide/