रोटरी क्लब ऑफ अकोटतर्फे बैलपोळ्यानिमित्त लंपी लसीकरण व आरोग्य शिबीर

रोटरी क्लबचा शेतकऱ्यांसाठी आगळावेगळा उपक्रम

अकोट : रोटरी क्लब ऑफ अकोटच्या वतीने बैलपोळा सणानिमित्त शेतकऱ्यांच्या जिवलग बैल व गायींसाठी लंपी लसीकरण व आरोग्य तपासणी शिबीर

ग्राम ताजनापुर येथे घेण्यात आले.शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि मुक प्राण्यांविषयी संवेदना जपत रोटरी क्लबने हा आगळावेगळा उपक्रम यशस्वीपणे राबविला.

वैद्यकीय सेवेचे नेतृत्व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत गावंडे, डॉ. विशाल पाचपोर, तसेच सहकारी निखिल वरणकार, अनिल घनबहादुर यांनी केले.

त्यांनी सर्वप्रथम गायी व बैलांची तपासणी करून लंपीचे लसीकरणजंत निर्मूलन गोळ्यांचे वाटप केले.

गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत शिबिरात आपले पशुधन आणून मोफत तपासणी करून घेतली. एकूण ९८ बैल व गायींची तपासणी व लसीकरण करण्यात आले.

शिबिराला विठ्ठलराव डोबाळे, वसंतराव डोबाळे, मनोज डोबाळे, मधुकर डोबाळे, नंदकिशोर डोबाळे, संतोष डोबाळे, गजानन ढोले, संदीप ढोक, प्रविण बानेरकर,

परिक्षित बोचे, ज्ञानेश्वर मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष इंजि. रवी पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव डॉ. नावेश मोहता यांनी मानले.

Read also : https://ajinkyabharat.com/hirpucha-durgesh-tihilacha-startup/