निंबा (अकोला) – स्वर्गीय श्रीधररावजी देशमुख उपाख्य मालक यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त निंबा व परिसरातील नागरिकांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया मार्गदर्शन तसेच विविध रक्त तपासण्या करण्यात येणार आहेत.
सदर शिबिर सोमवार, २३ फेब्रुवारी २०२६, सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत श्री मारुती संस्थान, निंबा येथे संपन्न होणार आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालय, अकोला येथील अनुभवी वैद्यकीय पथक नागरिकांची तपासणी करणार आहे.
रक्त तपासणीत CBC, HbA1c, LFT, KFT, T3, T4, TSH, कॅल्शियम, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन B12, हिपॅटायटिस बी (HBsAg) यासारख्या महत्त्वाच्या तपासण्या मोफत केली जाणार आहेत. या तपासण्या सुमारे २००० रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या असून नागरिकांना एकाच ठिकाणी व्यापक आरोग्य तपासणीची संधी मिळणार आहे.
Related News
चिंचखेड खुर्दमध्ये शिवजयंती निमित्त मोफत आरोग्य शिबिर
चिंचखेड खुर्द येथील विश्र्वशांती बुद्ध विहार समिती ट्रस्ट यांच्या वतीने जेतवन बाल उद्यान य...
Continue reading
Milk and Calcium : शरीरासाठी का अतिशय महत्त्वाचे?
Milk and Calcium : आजच्या आधुनिक जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे झाले आहे. बदलत...
Continue reading
Mumbaiमुंबईत डिजिटल अरेस्ट: 68 वर्षीय महिलेला 3.71 कोटी रुपयांची फसवणूक
Mumbaiत डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 68 वर्षीय महिलेला तब्बल 3.71 कोटी रुपयांची फ...
Continue reading
श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, निंबा येथे संयुक्त पालक सभा संपन्न
बाळापूर तालुक्यातील ग्राम निंबा येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महावि...
Continue reading
FD मध्ये आजीवन कमाई गुंतवणे किती योग्य? तज्ज्ञांनी सांगितला योग्य मार्ग – जाणून घ्या सविस्तर
आजच्या धावपळीच्या युगात सुरक्षित FD गुंतवणूक हा प्रत्येकाचा प्...
Continue reading
मूर्तीजापूर – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गंभीर आजारांनी ग्रस्त मतदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली घरून मत...
Continue reading
अंड्याचा पिवळा भाग खाणे हा प्रश्न आज अनेकांच्या मनात असतो. काही लोक अंड्याचा पिवळा भाग टाळतात कारण त्यात चरबी आणि कोलेस्ट्रॉल जास्त असल्याचे...
Continue reading
परिचय : ऊर्जा कमी, आळस जास्त? कारण असू शकतं “Vitamin B12 deficiency”
Health Care : आपण अनेकदा दिवसभर थकवा, आळस, डोकेदुखी किंवा लक्ष केंद्रित करण्य...
Continue reading
महिलांसाठी रक्त तपासणी शिबिर – आरोळी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम
रक्त हा मानवी शरीरासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. तो शरीरातील सर्व अवयवांपर्यंत ऑक्सि...
Continue reading
मोतीबिंदू शस्त्रक्रियेस पात्र रुग्णांना पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन केले जाईल. आयोजकांच्या आवाहनानुसार ज्येष्ठ नागरिक व गरजू रुग्णांनी शिबिराचा विशेष लाभ घ्यावा.स्वर्गीय श्रीधररावजी देशमुख उपाख्य मालक प्रतिष्ठान, निंबा चे सचिव प्रा. डॉ. मंदार कृष्णराव देशमुख यांनी सर्व नागरिकांना कुटुंबासह उपस्थित राहून मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
स्थान: श्री मारुती संस्थान, निंबा, ता. बाळापूर, जि. अकोला
दिनांक: सोमवार, २३ फेब्रुवारी २०२६
वेळ: सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत
read also : https://ajinkyabharat.com/60-crore-nidhine-ajab-bungalow-nagpurs-grand-renovation-historic-heritage-revived/