अकोला | प्रतिनिधी
रिधोरा गावात सोमवारी रात्री उशीरा एक धक्कादायक प्रकार घडला.
रात्री ११ वाजताच्या सुमारास जितेंद्र भागवत यांच्या घरात भारतीय नाग (Indian Spectacled Cobra) हा अत्यंत विषारी साप आढळून आला.
Related News
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
संपूर्ण प्रौढ अवस्थेतील आणि न्युरो टॉक्सिक विष असलेल्या या सापामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच MH30 सर्पमित्र टीमचे सुरज इंगळे आणि अभय निंबाळकर तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
त्यांनी अत्यंत सावधगिरी आणि कौशल्य वापरून सापाला सुरक्षितपणे पकडले.
या मोहिमेत स्थानिक रहिवासी नितीन देशमुख आणि अनीरुद्ध मानकर यांचेही सहकार्य लाभले.
सदर साप निसर्गात सुरक्षित सोडण्यात आला असून कोणतीही हानी टळली आहे.
नागरिकांनी सर्पमित्रांच्या सतर्कतेचे आणि वेळेवर दाखवलेल्या धाडसाचे कौतुक केले.
सर्पमित्रांकडून आवाहन
साप आढळल्यास घाबरून न जाता त्याच्यावर दूरून लक्ष ठेवावे, कोणताही साप मारू नये आणि तात्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा.
सर्प हाताळण्याचा प्रयत्न केल्यास जीवितधोकाही संभवतो, यासाठी फक्त तज्ज्ञांनाच पाचारण करणे सुरक्षित असते, असे आवाहन करण्यात आले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pimpkhuta-yethil-chori-gallele-gavansh-polysani-caught/