जामखेड (जि. अहमदनगर) –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी वसतिगृह, आरोळे वस्ती, जामखेड येथे
रॅगिंगचा गंभीर प्रकार समोर आला असून, वसतिगृहातीलच काही विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या
Related News
सततच्या पावसामुळे तीन वेळा पेरणी वाया; शेतकऱ्यांचा आक्रोश, नुकसानभरपाईची मागणी
देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक;
कोकणात मुसळधार पावसाचा हाहाकार;
प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला अकोल्यात निषेध.
मध्यप्रदेशातून पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू; कुरणखेडमध्ये हळहळ
विदर्भ स्तरीय अभया परिषद उत्साहात संपन्न, कार्यकर्ता तुषार हांडे सन्मानित.
पिकविमा मंजूर तरीही थकलेली रक्कम; शेतकऱ्यांचा संताप, कृषी अधिक्षकांना निवेदन
अकोट रोटरी क्लब चा शपथग्रहण सोहळा संपन्न
“ऑपरेशन प्रहार”ची मोठी कारवाई: अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांवर कारवाई, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे परिसरात
तीव्र संतापाची लाट उसळली असून, वसतिगृह प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
पोलीस तातडीने हालचालीत, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ठसा नाही
जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी तातडीने वसतिगृहाला भेट दिली,
मात्र वसतिगृहाचे वरिष्ठ अधिकारी अद्यापही घटनास्थळी दाखल झालेले नाहीत.
त्यामुळे प्रशासन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
जिल्हास्तरावर चौकशी समिती स्थापन
या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेता जिल्हास्तरावर चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण कोमटीवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वसतिगृहाला भेट देत चौकशी सुरू केली आहे.
रॅगिंग म्हणजे नेमकं काय?
रॅगिंग म्हणजे कनिष्ठ विद्यार्थ्यांवर वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून शारीरिक, मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक स्वरूपाचा त्रास देणे. यामध्ये अनेक अमानवी प्रकारांचा समावेश होतो:
-
शारीरिक रॅगिंग: मारहाण करणे, कपडे काढायला लावणे, अश्लील कृती करायला लावणे.
-
मानसिक रॅगिंग: शिवीगाळ, अपमान करणे, धमकावणे, मानसिक दबाव टाकणे.
-
सामाजिक रॅगिंग: सार्वजनिकपणे अपमान करणे, एकटं पाडणे, बहिष्कृत करणे.
-
आर्थिक रॅगिंग: जबरदस्तीने पैसे मागणे, खर्चासाठी दबाव आणणे.
पुढील काय?
जिल्हा प्रशासनाकडून या प्रकाराची सखोल चौकशी सुरू असून, दोषींवर कडक कारवाई होणार असल्याचं
प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वसतिगृहांमध्ये रॅगिंग विरोधी
उपाययोजना आणि कठोर अंमलबजावणी गरजेची असल्याचा सूर शिक्षण क्षेत्रातून उमटत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/%f0%9f%87%ae%f0%9f%87%b3-pahalgam-terrorist-hallyanantar-india/