निवासी आश्रमशाळा फक्त शासनाचा अनुदान लाटण्यापुरतीच मर्यादित?

वसतिगृहातील सगळे विद्यार्थी बेपत्ता

पोळ्यापासून शाळा प्रशासनासह वसतिगृहातील सगळे विद्यार्थी बेपत्ता

मानोरा – वाशिम जिल्ह्यातील वाईगौळ (अमरगड) येथील

निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील गंभीर वास्तव उघडकीस आले आहे.

शासनाकडून दररोज विद्यार्थ्यांच्या परिपोषण आहाराच्या अनुदानावर चालणारी ही शाळा प्रत्यक्षात पूर्णपणे बंद असल्याचे आढळले.

सण-उत्सवाच्या आडून विद्यार्थ्यांना मनमानीपणे सुट्टी देणे,

मुख्याध्यापक आणि वस्तीगृह अधीक्षक शाळेत हजर नसणे,

तसेच नियमांच्या विपरीत कामकाज चालवणे अशा गंभीर

तक्रारींनी शाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

गंभीर बाब :

मंगळवार सकाळी ११ वाजता शाळा व वस्तीगृहाला भेट दिली असता,

एकही विद्यार्थी हजर नव्हता.

वस्तीगृह अधीक्षक मराठे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी

“मी आजारी आहे, मला माहिती नाही” असे सांगून जबाबदारी झटकली.

तर मुख्याध्यापकांनी “आज शाळेला सुट्टी आहे, पोळ्यापासून शाळा बंद आहे” असे धक्कादायक उत्तर दिले.

गैरव्यवहारांचे सावट :

या संस्थेच्या व्यवस्थापनाकडून पूर्वीपासूनच शासकीय नियम डावलून नातेवाईकांना नोकऱ्या देणे,

डे-स्कॉलर विद्यार्थ्यांना कागदोपत्री निवासी दाखवणे,

तसेच बेकायदेशीर कृत्ये व अपहार केल्याचे जिल्हा व विभागीय समितीच्या अनेक अहवालातून सिद्ध झाले आहे.

याप्रकरणी विद्यमान अध्यक्षांवर दंडही आकारण्यात आला होता.

प्रशासनाचा आळशीपणा :

स्थानिक नागरिकांच्या मते, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक दीपा हेरोळे

यांच्या पाठबळामुळेच शाळा प्रशासनावर कारवाई होत नसल्याचा संशय व्यक्त होत आहे.

read also : https://ajinkyabharat.com/kuthalahi-tantric-bighad-nasatanahi-shelubazar-yethil-state-banke-atm-closed/