‘लाडकी बहीण’ योजनेसाठी सप्टेंबरमध्येही सुरू राहणार नोंदणी

राज्यातील

राज्यातील महिलांना दिलासा

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील

पात्र महिलांना आता सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यास

Related News

परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास

मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. कु.तटकरे म्हणाल्या की,

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या

आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची

निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’

योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

यापूर्वी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती.

आता ही नोंदणी सप्टेंबर २०२४ मध्येही सुरू राहणार आहे.

तरी अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे

यांनी केले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/the-management-of-st-employees-started-in-rural-bhagala-the-most-hit/

Related News