पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार
पाऊस पडत आहे. त्यातच गणेशोत्सव तोंडावर आला आहे.
गणेश मूर्ती बूक करण्यासाठी भाविक दुकानात गर्दी करत आहेत.
Related News
मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्...
Continue reading
मोठा दणका! मुंबईत मंत्र्यांच्या फ्लॅटवर थेट कारवाई; उच्चभ्रू टॉवरमधील 128 फ्लॅटवर हतोडा?
मुंबई : मुंबईतील अत्यंत उच्चभ्रू आणि चर्चेत असलेल्या रुस्तुमजी ...
Continue reading
सरकारचा मोठा निर्णय! गव्हाचे पीठ, मैदा आणि रव्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली; चार वर्षांनंतर काय घडलं?
केंद्र सरकारने गव्हाचे पीठ, मैदा, रवा आ...
Continue reading
Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका, 4 निर्णय खूप महत्त्वाचे; विद्यार्थ्यांना मोठं गिफ्ट!
Maharashtra Cabinet Decisi...
Continue reading
पाय बांधले, डोक्यावर वार; NEET विद्यार्थिनीच्या हत्येने वाराणसी हादरलं, पोस्टमॉर्टम रिपोर्टने उडवली खळबळ
वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये NEET परी...
Continue reading
Manoj Jarange Patil : 58 लाख नोंदी दिल्या, आता कुणबी प्रमाणपत्र द्या; जरांगेंची सरकारसमोर थेट अट
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक मनोज जरां...
Continue reading
रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई; दिपाली सय्यद, सुषमा अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या...
Continue reading
Mumbai : मुंबईत हुंडा छळाच्या तक्रारींमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ; मात्र हुंडाबळी आणि आत्महत्यांमध्ये मोठी घट
Mumbai : मुंबईत विवाहित महिलांच्या हुंड्यासा...
Continue reading
तणाव, चिंता विसरा! शांत-आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
धावपळीचे जीवन, कामाचा वाढता ताण आणि बदलती जीवनशैली यामुळे मा...
Continue reading
भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत फडणवीसांची एंट्री? दिल्ली वाऱ्या वाढल्या
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Continue reading
तरुणी सेल्फी काढायला आली अन् Rahul Gandhi ना किस देऊन गेली; भर कार्यक्रमातील VIDEO व्हायरल
Rahul Gandhi Video : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते
Continue reading
अमेरिकेशी युद्ध सुरू असताना इराणला सापडला मोठा ‘ऊर्जा खजिना’; 7.5 ट्रिलियन क्युबिक फूट गॅसचा साठा
Iran Gas Discovery : अमेरिका आणि इस्रायलस...
Continue reading
मात्र, नुकतीच गणेशभक्तांना थक्क करणारी गोष्ट समोर आली आहे.
गणेश मूर्ती विक्रेत्यांनी गणेश मूर्तींच्या किंमतीत 30 टक्क्यांनी वाढ
केली आहे. ज्यामुळे सर्वसामांन्याचा खीसा चांगलात रिकामा होणार
आहे. काही ठिकाणी मूर्ती दुप्पट भावात विकल्या जात आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून, रायगड जिल्ह्यातील पेण शहरात सतत
मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गणपती मूर्ती भिजल्या आहेत.
काहींचे रंग उतरले आहेत. तर, काहींची माती निघाली आहे. मूर्तींची
लक्षणीय कमतरता जाणवू लागली असल्याने मूर्तींच्या किमतीत 25 ते 30
टक्के वाढ झाली आहे. काही स्थानिकांनी आपली निराशा व्यक्त करत म्हटले की,
‘दरवर्षी एकाच दुकानात आम्ही गणेश मूर्ती बुक करतो. गेल्या आठवड्यात
आम्ही आमची गणपतीची मूर्ती बुक करण्यासाठी गेलो होतो. दरवाढ पाहून
आम्ही थक्क झालो. गेल्या वर्षी एक फूट उंचीच्या गणपती मूर्तीची किंमत 1,800 होती,
मात्र यंदा त्याच मूर्तीची किंमत 3,000 आहे. आम्ही जवळपास दुप्पट किंमतीत
मूर्ती विकत घेत आहोत. कारण विचारले तर सांगण्यात येते की, मुसळधार
पावसामुळे मूर्तींची कमतरता आहे.’ मूर्ती उत्पादकांचे प्रमुख केंद्र असलेल्या
पेण शहरातील गणपती मूर्तींच्या उत्पादनावर पावसाचा गंभीर परिणाम झाला आहे.
मुसळधार पावसामुळे मूर्ती खराब झाल्या. मूर्तींचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करूनही
, शेकडो मूर्तींची नासाडी झाली. त्या विकल्या जाऊ शकत नाहीत.
परिणामी, उर्वरित स्टॉकच्या किमती वाढल्या गेल्या आहेत.
असे चित्र असले तरीही पुण्यात उत्सव सुरू होण्याआधीच आपल्या गणपतीच्या
मूर्ती बूक करण्यासाठी पुणेकरांमध्ये उत्सुकता पहायला मिळत आहे. जास्त खर्च असूनही,
शेकडोच्या संख्येन नागरिक आपला ‘बाप्पा’ शोधण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी करत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/registration-for-ladki-bahin-scheme-will-start-in-september-only/