रेकॉर्डवरील गुन्हेगारांशी थेट संवाद

रेकॉर्डवरील

अकोला –  जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक अकोला श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला शहरातील पोलीस स्टेशनला दोनपेक्षा जास्त गुन्ह्यांमध्ये

सामील असलेल्या 275 गुन्हेगारांची ओळख परेड पोलीस अधीक्षक कार्यालयात घेण्यात आली.

दिनांक 22.08.2025 चे सकाळी 10.30 पासुन सूर झालेल्या संवाद सत्रा चा दुपारी 03 वा समारोप करण्यात आला.

जवळपास 4 तसा पेक्षा जास्त वेळ संवाद सत्र चालू होते.अकोला शहरातील 08 पोलीस स्टेशन अंतर्गत नोंद असलेले रेकॉर्डवरील गुन्हेगार या उपक्रमात सहभागी झाले.

सर्व शहरातील सर्व ठाणेदारांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यवाही दरम्यान पोलीस अधीक्षकांनी प्रत्येकाशी वैयक्तिक संवाद साधत त्यांच्या चुका मान्य करण्यास प्रवृत्त केले.

त्यांनी पुढील काळात पुन्हा गुन्हेगारीच्या वाटेवर न जाण्याचा सल्ला दिला व आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले. आपले पोलीस रेकॉर्ड हे अद्यावत करण्यात आले असून,

जर गुन्हे प्रवृत्ती थांबविली नाहीतर तडीपार, एम.पी.डी.ए., मोक्का, सारखी कठोर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा दिला, तसेच पोलीस अधीक्षक यांनी समाजात सकारात्मक

बदल घडवून आणण्यासाठी गुन्हेगारी क्षेत्राकडे न वळता पोलीस विभाग ngo, नामवंत कंपनी, यांच्या संपर्कात आहें, आपल्यातिल बेरोजगार यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून

देण्याबाबतही चर्चा केली. गुन्हेगारीपासून दूर राहून समाजभिमुख जीवन जगण्यासाठी आवश्यक ती मदत पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचा संदेश त्यांनी दिला.

अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे गुन्हेगारांमध्ये आत्मपरीक्षण होऊन समाजात सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला.

Read also : https://ajinkyabharat.com/shochya-historical-sarvat-mahagada-competitive/