जबरदस्त फीचर्ससह रियलमी जीटी ६ लॉन्च

रियलमी

रियलमी जीटी ६ हा मोबाईल चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात भारतात आणि निवडक जागतिक बाजारपेठेत

लॉन्च करण्यात आलेला नवीन जीटी सीरिजचा हा फोन

Related News

आता कंपनीच्या मायदेशात किरकोळ बदलांसह लॉन्च करण्यात आला आहे.

चीनमध्ये लाँच झालेला व्हेरियंट भारतीय व्हेरियंटपेक्षा पूर्णपणे वेगळा दिसत आहे.

चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या व्हेरियंटमध्ये ६.७८ इंचाचा एमोलेड डिस्प्ले असून

तो स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेटवर चालतो.

यात ५० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स ८९० कॅमेरा युनिट

आणि १२० वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५ हजार ८०० एमएएच बॅटरी आहे.

फोनच्या भारतीय व्हेरियंटमध्ये स्नॅपड्रॅगन ८ एस जेन चिपसेट असून

५५०० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

म्हणजेच चीनमध्ये मोठ्या बॅटरीसह लॉन्च करण्यात आले आहे.

चीनमध्ये रियलमी जीटी ६ च्या १२ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत

२ हजार ७९९ चीनी युआन (अंदाजे ३२,००० रुपये),

१६ जीबी २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ३ हजार ९९ चीनी युआन (अंदाजे ३५,००० रुपये),

१६ जीबी + ५१२ जीबी व्हेरिएंटची किंमत ३ हजार ३९९ चीनी युआन (अंदाजे ३९,००० रुपये)

आणि १६ जीबी ५१२ जीबी व्हेरिएंटची किंमत ३ हजार ८९९ चीनी युआन (अंदाजे ४४,००० रुपये) आहे.

चीनमध्ये हा फोन डार्क साइड ऑफ द मून,

लाइट इयर व्हाईट आणि स्टॉर्म पर्पल कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे.

भारतात या मॉडेलच्या ८ जीबी २५६जीबी व्हेरियंटची किंमत

४० हजार ९९९ रुपये आहे. तर, १२ जीबी २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत

४२ हजार ९९९ रुपये आणि १६ जीबी ५१२ जीबी व्हेरिएंटची किंमत ४४ हजार ९९९ रुपये आहे.

भारतात हा फोन स्लिव्हर आणि रेझर ग्रीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/state-kabaddi-competition-from-monday/

Related News