स्वच्छ चारित्र्यसंपन्न उमेदवारांना पाठिंबा देऊ -रविकांत तुपकर

चांगल्या

चांगल्या विचाराचे, चरित्र संपन्न आणि शेतकऱ्यांशी नाळ

जुळवून ठेवणाऱ्या उमेदवारांना क्रांतिकारी शेतकरी संघटना

पाठिंबा देणार असल्याची घोषणा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे

Related News

अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा येथे केली. ज्यांनी

ऐनवेळी दगा दिला त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे

सांगत महाविकास आघाडी सोबत जाणार नसल्याचही तुपकर

यांनी स्पष्ट केले आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर हे बुलढाणा

विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे निवडणूक

लढविण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव

ठाकरे यांच्याशीही संपर्क साधला होता. दोन-तीन वेळेस बैठका ही

झाल्या. त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम हो सांगितलं परंतु ऐनवेळी नाही सांगितलं.

आता आम्ही शेतकऱ्याची ताकद त्यांना दाखवून देऊ, त्यांचा करेक्ट

कार्यक्रम करू असे सांगतानाच महाविकास आघाडी सोबत

जाणार नसल्याचे ही स्पष्ट केले. क्रांतिकारी शेतकरी संघटना ही

सामाजिक संघटना आहे. या संघटनेसोबत असणारे लोक अपक्ष

उमेदवार म्हणून विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार आहे. त्यांना

क्रांतिकारी शेतकरी संघटना पाठिंबा देणार आहे. अशी माहिती

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज दिली.

Read also: https://ajinkyabharat.com/pakistans-biggest-3-year-old-world-championship-victory/

Related News