रवी भाऊ, राष्ट्रवादीचाही विचार करा, बहिणीच्या नात्याने विनंती; रुपाली पाटलांची धंगेकरांना खुली ऑफर

रवी भाऊ, राष्ट्रवादीचाही विचार करा, बहिणीच्या नात्याने विनंती; रुपाली पाटलांची धंगेकरांना खुली ऑफर

विधानसभा आणि लोकसभा निवडणूकांनंतर आता स्थानिक

स्वराज्य निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे.

पुण्यातील काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर शिंदे गटात जाणार आहेत अशी चर्चा आहे.

त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांना ऑफर दिली आहे.

त्यामुळे धंगेकरांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

ते कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार आहेत.

पुणे : विधानसभा आणि लोकसभा निवडणुका पार पडल्यावर आता आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका होणार आहेत.

यासाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या तारखा कधीही जाही होऊ शकतात. त्याआधी पक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहेत.

सत्ताधारी शिवसेना पक्षाचे ऑपरेशन टायगर सुरू केले आहे.

याच पार्श्वभूमीवर पुण्यातील काँग्रेस नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर शिंदे गटात

जाणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. मात्र यादरम्यान रवींद्र धंगेकरांना दादांच्या राष्ट्रवादीकडूनही ऑफर आली आहे.

रवी भाऊ आपण हाडाचे कार्यकर्ते, सक्षम लोकप्रतिनिधी निवडणुकीत हार जीत चालतच असते.

नेतृत्व, कामाची पद्धत थांबत नसते. भाऊ तुझ्या सोबत काम केले आहेच.

काही दिवस बातमी येत आहे दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहे. कार्यकर्त्यांची मीटिंग घेणार आहात,

कुठे प्रवेश करायचा या संदर्भात चर्चा विनिमय करणार आहात. रवी भाऊ अजित दादांचे आणि तुझे संबंध नेहमीच चांगले आहे ते तू अनुभवले आहेत.

तुझ्यासारखे काम करणारा, सक्षम, सर्वांना एकत्रित घेऊन काम करणाऱ्या हाडाचा कार्यकर्ता,

लोकप्रनिधिनी नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार करावा अशी कार्यकर्ता बहीण म्हणून विनंती असेल.

बाकी पक्ष वेगळे असले तरी हाडाचे कार्यकर्ते, काम करणारे सक्षम लोकप्रतिनिधी बहीण भाऊ नाते कायम आहेच, असं रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी अजित पवार यांना कामानिमित्त भेटून आल्याची दिली होती माहिती आहे.

शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असताना आता रवींद्र धंगेकर यांना राष्ट्रवादीने सुद्धा खुली

ऑफर दिली आहे यानंतर आता रवींद्र धंगेकर नक्की काय निर्णय घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहेरवींद्र धंगेकर उद्या

किंवा परवा आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन राजकारणाची पुढील दिशा ठरवणार आहेत.

त्यापूर्वीच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना ऑफर दिली आहे.

त्यामुळे रवींद्र धंगेकर हे वारंवार सांगत जरी असले मी काँग्रेसमध्येच आहे तरी कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ते पुढील निर्णय जाहीर करणार आहेत.

Read more here

https://ajinkyabharat.com/na-boni-na-mithun-or-superstarsathi-sridevine-paavala-is-4-days-fast/