अकोट – तालुक्यात पावसाची संततधार सुरु असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला होता.
त्याच चिखलामुळे अकोट ते अकोला रोडवरील पाणेट रस्त्याजवळ खडकी टाकळी येथील रहीवासी महिला सुनंदा सदाशिव यांची मोटरसायकल स्लिप होऊन त्यांच्या अपघात झाला.
या अपघातात सुनंदा सदाशिव ह्या गंभीररित्या जखमी झाल्या.सदर महिला ही अर्धा तास याच ठिकाणी रोडवर पडलेली होती.
पण कोणीही या महीलेला उचलण्याची किंवा पाहण्याची हिंमत दाखवली नाही.
अखेर हा प्रकार प्रहार जनशक्ती पक्षाचे जीवन खवले यांना समजताच त्यांनी स्वतः ताबडतोब धाव घेत अगदी पाच मिनिटात रुग्णवाहिका घेऊन
त्या जखमी महिलेला उचलून रुग्णवाहिका मध्ये टाकले.व पुढील उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात तात्काळ पाठवले.
यामुळे या महिलेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जीवन खवले हे देव दूत ठरले.जीवन खवले हे वेळोवेळी कुठल्या ना कुठल्या कामामुळे अगदी चर्चेत राहले आहेत.
अशा या त्यांच्या कार्यामुळे खरोखर त्या महिलेने जीवन खवले यांचे आभार मानले.
Read also : https://ajinkyabharat.com/bharatachi-self-reliance-wadwell-rampage-missile/