पातूर – पातूर शहरातील टीकेव्ही चौक ते आगीखेड रस्त्याची दयनीय अवस्था नागरिकांसाठी सतत त्रासदायक ठरली आहे. पावसाळ्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारक व विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून हालचाल करावी लागत आहे.
रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी केल्या असतानाही प्रशासनाकडून अद्याप दखल घेतली गेली नाही. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ८ सप्टेंबर रोजी टीकेव्ही चौक ते आगीखेड रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले.
रास्ता रोको आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता राजेश राठोड यांनी स्थळी भेट दिली आणि रस्त्याची दुरुस्ती व कॉंक्रिटीकरण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते थांबवण्यात आले.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे इशारा दिला की, तातडीने रस्ता दुरुस्ती न झाल्यास पुन्हा रस्ता रोको आंदोलन केले जाईल.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/polis-ethical-training-union-youth-guidance/