पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात युवकांना मार्गदर्शन

डॉ. सुगत वाघमारे यांनी युवकांना दिला देशसेवा व संरक्षणाचा कानमंत्र

डॉ. सुगत वाघमारे यांनी युवकांना दिला देशसेवा व संरक्षणाचा कानमंत्र;

यवतमाळ,प्रतिनिधी :
‘पोलीस दलात सहभागी होण्याचे तुमचे स्वप्न आहे, त्याला पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करा! अभ्यास करा! तुम्ही जर नियोजन बद्ध तयारी केली तरच तुम्हाला यश मिळेल.पोलीस दलात सहभागी होऊन देश सेवा व संरक्षणाचे व्रत अंगीकारा” असा प्रेरणादायी कानमंत्र प्रसिद्ध उद्योजक आणि ‘डिक्की’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुगत वाघमारे यांनी येथील पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रातील युवकांना दिला
अकोला येथील तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटी आणि महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागाच्या संयुक्त विद्यमाने येथील नेहरू क्रीडा मैदानावर अल्पसंख्याक युवकांसाठी पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर चालवले जात आहे. या केंद्राला डॉ. सुगत वाघमारे यांनी रविवारी (दि. 7) सायंकाळी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे माजी सदस्य अॅ ड. संजय सेंगर आणि दैनिक ‘अजिंक्य भारत’चे संचालक श्रीकांत पिंजरकर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना अॅ‍ड. संजय सेंगर यांनी युवकांमध्ये जोश भरला. ते म्हणाले, ‘ध्येय एकच ठेवा, आपण येथे पोलिस भरतीची लढाई जिंकण्यासाठीच आलो आहोत आणि ती जिंकल्याशिवाय थांबणार नाही.’ त्यांच्या या शब्दांनी तरुणांमध्ये नवा आत्मविश्वा्स संचारला. त्यानंतर डॉ. सुगत वाघमारे यांनी युवकांशी संवाद साधला. आपल्या निरक्षर वडिलांनी कष्टाच्या जोरावर उद्योग उभारल्याची प्रेरणादायी कहाणी सांगत ते म्हणाले, ‘आम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज यशस्वी होण्याचा प्रयत्न करीत आहोत. तुम्हीदेखील जर नोकरी मिळविण्यात अपयश आले तर निराश होऊ नका. आयुष्य खूप सुंदर आहे. उद्योगाची कास धरा, तुमचे भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल.’ त्यांनी युवकांना पोलिस भरतीसाठी आवश्यक शारीरिक व मानसिक तयारीचे मार्गदर्शन केले. सोबतच, ‘डिक्की’ सारख्या संस्थांच्या माध्यमातून उद्योग उभारणीसाठी प्रकल्प अहवालापासून ते बाजारपेठेपर्यंत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वाासन दिले. याप्रसंगी श्रीकांत पिंजरकर यांनीही युवकांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामुळे प्रशिक्षणार्थींना केवळ नोकरीच नव्हे, तर उद्योजकतेचीही नवी दिशा मिळाली. याप्रसंगी प्रकल्प व्यवस्थापक राजेश चक्रनारायण, ‘अजिंक्य भारत’चे जिल्हा आवृत्ती प्रमुख राजकुमार भितकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ‘अजिंक्य भारत’चे येथील कार्यालयीन व्यवस्थापक जयंत राठोड यांनी केले, तर आभार वरिष्ठ बातमीदार गणेश खडसे यांनी मानले.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/akotamadhye-eid-miladunnabi-for-a-grand-procession-social-aikya-message/