रक्षाबंधनाला पर्यावरणपूरक स्पर्श : तोष्णीवाल महाविद्यालयातील 98 विद्यार्थ्यांची अनोखी राखी निर्मिती

रक्षाबंधनाला पर्यावरणपूरक स्पर्श : तोष्णीवाल महाविद्यालयातील 98 विद्यार्थ्यांची अनोखी राखी निर्मिती

अकोला – रक्षाबंधन सणाला पर्यावरणपूरक स्वरूप देत अकोल्यातील राधाकृष्ण तोष्णीवाल महाविद्यालयात अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

या निमित्ताने महाविद्यालयातील तब्बल ९८ विद्यार्थ्यांनी कडधान्य, नैसर्गिक फुले आणि पाने यांसारख्या साहित्याचा वापर करून पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या.

विद्यार्थ्यांनी आपली सृजनशक्ती वापरून आकर्षक राख्या साकारल्या आणि त्यातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला

 सण साजरा करतानाच निसर्गाची जपणूक कशी करता येते, याचा आदर्श या उपक्रमातून घालून देण्यात आला.

या उपक्रमात मुलींसोबत मुलांनीही भाग घेतल्याचे दिसून आले .

महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक करत भविष्यात अशा उपक्रमांना अधिक प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले.

Read Also :https://ajinkyabharat.com/dhagafutimu-hhakar-punda-shetakyanchaya-pikanch-aanat-damage/