राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर
राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याने जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.
कोणत्या जिल्ह्यात/शहरात शाळांना सुट्टी?
मुंबई शहर व उपनगर –

मुंबई महापालिकेने रेड अलर्टचा इशारा लक्षात घेऊन सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालयांना उद्या (१९ ऑगस्ट) सुट्टी जाहीर केली आहे.
रायगड जिल्हा –

मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील सर्वशाळा व महाविद्यालये बंद राहणार.
पालघर जिल्हा –
पालघर जिल्हा प्रशासनाने देखील पावसाचा धोका लक्षात घेऊन शाळा व महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे.
ठाणे शहर –
ठाण्यात आज दुपारपासूनच शाळांना सुट्टी देण्यात आली होती. आता उद्याही सुट्टी कायम राहणार.
मीरा-भाईंदर –
मीरा भाईंदर महानगरपालिकेने सर्व शाळांना सुट्टी दिल्याचे जाहीर केले आहे.
कल्याण-डोंबिवली –
कल्याण डोंबिवली महापालिकेने प्रसिद्धीपत्रक काढून उद्यासाठी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
म्हणजेच उद्या (१९ ऑगस्ट २०२५) मुंबई, रायगड, पालघर, ठाणे, मीरा-भाईंदर आणि कल्याण-डोंबिवली या ठिकाणी सर्व शाळा व महाविद्यालये बंद राहणार आहेत.
