राजराजेश्वर महाराजांच्या कावड यात्रेसाठी प्रशासन सज्ज; मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

राजराजेश्वर महाराजांच्या कावड यात्रेसाठी प्रशासन सज्ज; मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

अकोला | प्रतिनिधी

श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराज यांच्या कावड यात्रेसाठी तयारी जोरात सुरू झाली आहे.

यावर्षी श्रावण महिना २८ जुलैपासून सुरू होत असल्याने, कावड यात्रा दोन आठवड्यांपूर्वीच नियोजनाच्या टप्प्यात आली असून,

Related News

गांधीग्राम ते जुने शहर या कावड मार्गाची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी संयुक्त पाहणी केली.

या मार्गावर दरवर्षी हजारो भाविक पूर्णा नदीचे पवित्र जल घेऊन राजराजेश्वर मंदिरात अर्पण करतात.

त्यामुळे यात्रेच्या पार्श्वभूमीवर मार्गावरील मटन दुकाने हटवणे,

रस्त्यावरील खड्डे भरून दुरुस्ती करणे, स्वच्छता आणि वाहतुकीची व्यवस्था योग्य ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

या पाहणीदरम्यान महानगरपालिका आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, आणि इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी यंदा अधिक नियोजनबद्ध पद्धतीने तयारी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read Also :  https://ajinkyabharat.com/nationalist-congresschaya-jilaha-general-secretary-paddi-vikas-pawar-yanchi-appointment/

Related News