राहुल गांधी यांनी आज वायनाड येथील भूस्खलन झालेल्या भागाचा दौरा केला.
बाधित लोकांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर माध्यमांशी केवळ
एक मिनिट वार्तालाप करून ते निघून गेले. राहुल गांधी यांचे वडील
Related News
राजीव गांधींची मे १९९१ मध्ये बॉम्बस्फोटात हत्या झाली होती.
या प्रसंगाची आठवण करून देताना आजही त्याचप्रकारचे दुःख मला झाले आहे,
असे ते म्हणाले. केरळमधील वायनाड येथे भूस्खलन होऊन
आतापर्यंत तीनशेहून अधिक लोक मृत्युमुखी पडल्याचे समोर आले आहे.
तर शेकडो लोक अजूनही बेपत्ता आहेत. केरळचे माजी खासदार राहुल गांधी
आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज वायनाड येथील
दुर्घटनाग्रस्त भागाचा दौरा केला. बाधित लोकांशी संवाद साधत त्यांना
धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी माध्यमांशी बोलत असताना राहुल गांधी
भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी म्हटले, “माझ्या वडिलांचा
ज्यावेळेस मृत्यू झाला होता, त्यावेळी मला जे दुःख झाले, तेच दुःख आज होत आहे.
मी तर वडील गमावले होते. पण वायनाडमध्ये काहींनी संपूर्ण कुटुंब गमावलं आहे.
कुणाचा भाऊ, वडील, आई दगावली आहे. राहुल गांधी हे २०१९ आणि २०२४ साली
वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.
२०२४ साली त्यांनी रायबरेली आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघातून
निवडणूक लढविली होती. त्यामुळे वायनाडचा राजीनामा देऊन याठिकाणी
प्रियांका गांधी निवडणूक लढवतील, अशी घोषणा काही महिन्यांपूर्वी काँग्रेसने केली होती.
त्यामुळे आजच्या दौऱ्यात राहुल गांधी यांच्यासह प्रियांका गांधीही दिसून आल्या.
“आम्ही वायनाडमधील लोकांच्या पाठीशी आहोत.
मला अभिमान आहे की, आज संपूर्ण देश वायनाडच्या मदतीसाठी पुढे आला आहे”,
असेही राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांना काही राजकीय प्रश्नही विचारण्यात आले.
त्यावर बोलताना ते म्हणाले, आज राजकारणावर बोलण्याची परिस्थिती नाही.
इथल्या लोकांना मदत हवी आहे. मी याक्षणाला राजकारण करू इच्छित नाही.
माझे संपूर्ण लक्ष वायनाडच्या लोकांना मदत मिळवून देण्यावर आहे.
यावेळी प्रियांका गांधींनीही लोकांशी संवाद साधला. काही काळानंतर
वायनाडमध्ये लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार असून या निवडणुकीला
त्या उभ्या राहणार आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या,
माझ्या भावाप्रमाणेच माझीही भावना आहे. मी एका मुलाला भेटले ज्याने
आपल्या कुटुंबाला वाचविण्यासाठी सहा तास प्रयत्न केले. पण तो कुटुंबाला वाचवू शकला नाही.
वायनाडच्या लोकांना मदत करण्यासाठी जे शक्य होईल, ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/rakhi-sawant-mns-district-presidents-comment-on-politics/