क्वाड देशांचा भारताला ठाम पाठिंबा;

क्वाड देशांचा भारताला ठाम पाठिंबा;

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे.

या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर भारतानं आक्रमक पवित्रा घेतला

असून पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

Related News

भारताने सिंधू जल करार तात्पुरता स्थगित केला असून व्यापारासह सर्व प्रकारचे संबंध तुटवले आहेत.

भारताच्या या निर्णयांना जागतिक पातळीवर मोठा पाठिंबा मिळत आहे. विशेषतः क्वाड देश — अमेरिका, जपान,

ऑस्ट्रेलिया आणि भारत — यांचे एकत्रित समर्थन भारताच्या बाजूने दिसून येत आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टेलिफोनवर चर्चा झाली.

यात त्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया कूटनीती भागीदारी आणखी बळकट करण्याचे ठरवले.

अल्बनीज यांनी प्रत्येक पावलावर भारतासोबत उभं राहण्याचा विश्वास दिला.

या पार्श्वभूमीवर, चीनलाही पाकिस्तानला मदत करताना आता अनेक वेळा विचार करावा लागणार आहे.

कारण क्वाडमधील चारही देश भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून दहशतवादविरोधी भूमिका अधिक आक्रमक झाली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही जपानी शिष्टमंडळाशी चर्चा करून संरक्षण सहकार्य अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची भूमिका आता अधिक प्रभावी होताना दिसत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/ahilyanagar-punyashlok-ahilyadevi-hokar-yanchaya-trishtabdinimitt-%e0%a5%ac-great-decision/

Related News