पुरग्रस्तांच्या मदतीला धावला सोनू सूद!

आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश, तेलंगणातील पुरग्रस्तांसाठी अन्नधान्य, वैद्यकीय कीट केले उपलब्ध 

आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला तुफान पावसानं झोडपल. आलेल्या पुरामुळे

अनेकांचा संसार उघड्यावर पडला. रस्ते, घरं, शेती पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांच्या

Related News

हातातोंडाशी आलेला गोड घास हिरावला गेला. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा

हात पुढे केला आहे. त्यात तेलुगु फिल्म इंडस्ट्रीतील अनेक चर्चेतील नावं देखील आहेत.

त्यात आता सोनू सूदची भर पडली आहे. आंध्र आणि तेलंगणातील पूरग्रस्तांच्या मदतीला

सोनू सूद धावला आहे. सोनू सूद यानं एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील पूरग्रस्तांना पुन्हा त्यांची घरे उभी करायला आपण मदत

करू, त्यांचं जीवन पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी आपण सर्व जनतेने एकत्र आलं पाहिजे.

तसंच जितकी मदत करता येईल तितकी मदत केली पाहिजे. सर्व लोक तुमच्यासोबत

आहेत’ अशा शब्दांत सोनू सूद यानं पूरग्रस्तांना धीर दिला.

सोनू सूदआंध्र प्रदेश आणि तेलंगणातील पूरपीडितांच्या मदतीला धावून गेला आहे.

तिथल्या लोकांना त्यानं अन्न, शुद्ध पाणी, वैद्यकीय कीट, राहण्यासाठी तात्पुरती सुविधा आदी

मदत केली आहे. त्याची संपूर्ण टीम हे काम करत आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/googles-special-doodle-for-paralympic-powerlifting/

Related News