महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले होते. सलग चार दिवस अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आणि काही भागात जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, बुधवारी राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाल्याचे चित्र दिसून आले.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारपासून राज्यभर पावसाचे प्रमाण कमी झाला आहे . काही भागांत हलक्या सरी ते अधूनमधून मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारीही अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या, तर मुंबई व ठाणे परिसरात पावसाची तीव्रता लक्षणीयरीत्या कमी झाली.
दरम्यान, मागील काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला, रस्त्यांवर पाणी साचले आणि काही ठिकाणी वाहतूक व दळणवळणाची साधने विस्कळीत झाली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी होत जाण्याची शक्यता आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/punyachaya-inaccessible-khediyal-aditi-parthechi-gaganbhari/