महाराष्ट्रातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्गाचे काम
अंतिम टप्प्यात आले आहे. त्यानंतर मुंबईवरुन थेट नागपूर प्रवास आठ
तासांवर येणार आहे. आता पुणे शहराला समृद्धी महामार्गाने जोडण्यात
Related News
देशाच्या जडण घडणीत विद्यार्थ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे :- अजित कुंभार
- By Yash Pandit
बीडच्या मस्साजोगमध्ये झालेल्या संतोष देशमुख हत्या
- By Yash Pandit
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजार समिती
- By Yash Pandit
ठाणेदार दिपक वारे यांची सिद्धेश्वर विद्यालय हातोला येथे भेट
- By Yash Pandit
शिवपुर येथील एकाच दिवशी दोन सख्या भावाचा मृत्यू
- By Yash Pandit
अकोल्यातील जुना हिंगणा येथील शेजारी राहणाऱ्या दोन जणांचा किरकोळ वाद
- By Yash Pandit
अकोल्यातील पिंजर येथील एका बारमध्ये दारू उधार न दिल्याने घडलेली
- By Yash Pandit
गजानन हरणे यांची राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड
- By Yash Pandit
नाफेडच्या विरोधात शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन !
- By Yash Pandit
श्री नारायण बहुउद्देशीय संस्था “संविधानाचा जागर” उपक्रम राबविणार! प्रजासत्ताक दिनी उपक्रमाचा मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेशा
- By Yash Pandit
१३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग
- By yash desk
अकोला: रामदासपेठ पोलिसांची धडक कार्यवाही, १० गोवंश जातीचे जनावरे कत्तलीसाठी अवैधपणे वाहतूक करताना आरोपी अटक
- By Yash Pandit
येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या
मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पुणे ते शिरुळ
दरम्यान 53 किलोमीटर लांब सहा पदरी फ्लायओव्हर उभारण्यात येणार आहे.
त्यानंतर अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर माध्यमातून पुणे समृद्धी
महामार्गाला जोडण्यात येणार आहे.
समृद्धी महामार्गासाठी उभारण्यात येणारा फ्लायओव्हर केसनंद गावातून सुरु
होणार आहे. हा मार्ग शिरूरपर्यंत जाणार आहे. या फ्लायओव्हरच्या निर्मितीसाठी
7515 कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच फ्लायओव्हार अहमदनगरवरुन समृद्धी
महामार्गाला जोडण्यासाठी अतिरिक्त 2050 कोटी खर्च येणार आहे.
यामुळे या प्रकल्पाचा एकूण खर्च 9565 कोटींवर जाणार आहे. पुणे ते समृद्धी
महामार्गपर्यंतचा रस्ता 250 किलोमीटर असणार आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत समृद्धी महामार्ग पुणे ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत जोडण्याचा
प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पुणे से छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय राजमार्ग आतापर्यंत
‘एनएचएआय’ कडून बनवला जात होता. तो आता ‘एमएसआयडीसी’ कडून तयार केला
जाणार आहे. यासाठी एप्रिल महिन्यात ‘एमएसआयडीसी’ सोबत करार झाला होता.
या मार्गामुळे केवळ पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान चांगला संपर्क होणार नाही
तर या भागातील आर्थिक आणि सामाजिक विकास होणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/jaideep-aptela-police-kothadi-till-13th-september/