पुणे – अमरावती वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावणार; बडनेरा स्थानकावर थांबा निश्चित

पुणे – अमरावती वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावणार; बडनेरा स्थानकावर थांबा निश्चित

पुणे, दि. ९ मे : पुणेकर आणि अमरावतीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

पुण्याला लवकरच चौथी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार असून ही ट्रेन थेट अमरावती मार्गावर धावणार आहे.

सध्या पुण्यातून तीन वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जात असून,

Related News

ही चौथी गाडी पुणे – नागपूर मार्गावर सुरु होणार आहे, ज्यामध्ये अमरावतीतील बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबा निश्चित करण्यात आला आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात नुकतीच माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार,

पुणे – नागपूर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरु करण्यात येणार असून, नागपूर – पुणे प्रवाशांसाठी हा एक वेगवान

आणि आरामदायक पर्याय ठरणार आहे. विशेष म्हणजे, या गाडीला अमरावती जिल्ह्यातील बडनेरा

स्थानकावर थांबा दिला जाणार आहे, ज्यामुळे अमरावतीकरांना थेट पुण्याशी वेगाने जोडणारा पर्याय मिळणार आहे.

सध्या पुण्यातील वंदे भारत एक्सप्रेस:

  1. पुणे – कोल्हापूर

  2. पुणे – हुबळी

  3. मुंबई सेंट्रल – सोलापूर (पुणे मार्गे)

या नव्या ट्रेनमुळे आता पुण्यातून थेट अमरावती मार्गे नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

यामुळे पुणे व विदर्भातील दळणवळण अधिक गतिमान आणि सोयीचे होणार आहे.

नागपूरला याआधीच तीन वंदे भारत गाड्यांची भेट मिळालेली आहे आणि आता ही चौथी वंदे भारत त्यात भर घालणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांमध्ये यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते.

ही गाडी कधीपासून सुरु होणार याची अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/indo-pak-sangharsh-parshvarvivar-social-media-vavanavan-peve/

Related News