आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहे.
त्यात आता सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
यांची चिपळूणमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
सध्या चिपळूणमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. तब्बल
१८ वर्षांनी शरद पवार यांची चिपळूणध्ये जाहीर सभा होत आहे.
त्यामुळे शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
शरद पवार यांची चिपळूण शहरातील बहादूरशेख येथील
स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर आज ही सभा होणार आहे.
या सभेला राष्ट्रवादी पक्षाचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
शरद पवार यांच्या या सभेची तयारी प्रदेश सरचिटणीस प्रशांत
यादव यांनी केली आहे. या सभेतून खासदार शरद पवार
निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.
या सभेपूर्वी शरद पवार हे छत्रपती शिवाजी महाराज,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण
करणार आहेत. त्यानंतर ते सावरकर मैदानात आयोजित केलेल्या
जाहीर सभेला उपस्थित राहणार आहे. शरद पवार यांच्या चिपळूण
मधील सभेला प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. चिपळूणसह
इतर अनेक तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सभास्थळी
जमले आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली
आहे. या सभेपूर्वी शरद पवारांनी चिपळूण नागरी पतसंस्थेच्या
सहकार भावनाला भेट दिली. यावेळी पतसंस्थेच्या विविध योजना
आणि उपक्रमांचा आढावा घेतला. तर दुसरीकडे भास्कर जाधव
यांनी शरद पवार यांची चिपळूणमध्ये भेट घेतली. ही सदिच्छा भेट
असल्याचे भास्कररराव जाधव म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/india-wins-3-gold-medals-in-chess-olympiad/