प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल
उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने पीपीएसची परीक्षा पुढे ढकलली
आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेत्या
Related News
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
शास्ती पुर्ण माफ करण्याचा प्रस्ताव पाठवा
प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर हल्लाबोल
केला आहे. योगी सरकार तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करू इच्छित
आहे, असे प्रियंका गांधी यांन म्हटले आहे. यासंदर्भात प्रियांका
गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे.
प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, यूपी पीसीएस प्रिलिम्सची
परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. यूपी टेक्निकल
एज्युकेशन सर्व्हिसेस-२०२१ च्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या
आहेत. तसेच, वारंवार परीक्षा पुढे ढकलणे, पेपरफुटी आणि
भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणे, हे
भाजप सरकारचे धोरण बनले आहे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
याचबरोबर, प्रियांका गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून
भाजपवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, “स्पर्धक विद्यार्थीही
यूपीपीसीएस परीक्षा दोन दिवसांत घेण्याच्या प्रस्तावाला विरोध
करत आहेत.
त्यांचा युक्तिवाद बरोबर आहे की, हीच परीक्षा दोन दिवसांत
घेतली, तर नॉर्मसाइजेशनच्या नावाखाली पुन्हा स्केलिंगचा खेळ
सुरू होईल. एकीकडे भाजप तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे,
नोकऱ्या न देऊन मागासवर्गीय, दलित आणि वंचितांचा
आरक्षणाचा अधिकारही हिरावून घेत आहे. “दरम्यान, उत्तर प्रदेश
लोकसेवा आयोगाने प्रांतीय नागरी सेवा प्राथमिक परीक्षा अनिश्चित
काळासाठी पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. परीक्षा पुढे
ढकलण्याची यंदाची ही दुसरी वेळ आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/beneficiaries-of-adkale-government-scheme-with-code-of-conduct/