प्रमोद भगतवर 18 महिन्यांच्या निलंबनाची कारवाई

प्रमोद भगत

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेला मुकणार

टोकियो 2020 पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या

प्रमोद भगत याच्यावर 18 महिन्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Related News

मिळालेल्या माहितीनुसार प्रमोद भगतवर 18 महिन्यांच्या निलंबनामुळे

प्रमोदला आगामी पॅरिस 2024 पॅरालिम्पिक स्पर्धेतही सहभाग घेता येणार नाही.

प्रमोद भगतवर ही कारवाई बॅडमिंटन महासंघाच्या अँटी-डोपिंग नियमाचे

उल्लंघन केल्याप्रकरणी झाली आहे. 1 मार्च 2024 रोजी,

कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन ऑफ स्पोर्ट डोपिंग विरोधी विभागाने केलेल्या पाहणीत

भगत १२ महिन्यांत तीन डोप टेस्टमध्ये अयशस्वी ठरला.

प्रमोद भगत SL3 या गटातून खेळतो. 29 जुलै मध्ये CAS अपील विभागाने

त्याने केलेली याचिका फेटाळून लावली होती. त्याचा अपात्रतेचा कालावधी आता लागू झाला आहे.

प्रमोद भगत हा बिहार राज्यातील आहे. तो एक व्यावसायिक पॅरा-बॅडमिंटनपटू आहे.

तो सध्या पॅरा-बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3 मध्ये जागतिक क्रमवारीत

2 ऱ्या  क्रमांकावर आहे. टोकियो 2020 पॅरालिम्पिक पुरुष एकेरी SL3 स्पर्धेत

भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते.

Read also: https://ajinkyabharat.com/work-band-movement-of-resident-doctors-to-stop-the-kolkata-incident/

Related News