येत्या 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता..

महाराष्ट्रात

एनडीआरएफची टीम तैनात..

महाराष्ट्रात आज आणि उद्या विजांच्या कडाकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.

कोकणात बहुतेक ठिकाणी, मराठवाड्यात अनेक ठिकाणी

Related News

आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज तर उद्या मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

आयएमडीच्या अंदाजानुसार, कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी

आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार झाला आहे.

पेरणी केलेली शेती बहरली आहे. कोरडे पडलेल्या नदी-

नाल्यांना पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे.

गेले तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. रायगड, रत्नागिरीसह

कोकणात पुढील दोन दिवस आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून

हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाडमध्ये एनडीआरएफची टीम

तैनात करण्यात आली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/kulup-todun-mp-balwant-wankhadeni-took-the-oath-of-mp-class/

Related News