अकोल्यात आठ वर्षांपासून विकास फाउंडेशनकडून उपक्रम
विधवा, परितक्ता, घटस्फोटिता महिलेने काय घालावे, कुंकू लावावे की लावू नये,
तिने कसे जगले पाहिजे, तिने दुसरे लग्न करावे की करू नये?
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
आजही असंख्य प्रश्न, शंका, निबंध समाजाकडून एकल महिलांवर घातले जातात.
अशात सौभाग्यवती महिलांप्रमाणेच एकल महिलांनाही वटपौर्णिमेचा उत्सव साजरा करता यावा,
यासाठी अकोल्यातील श्री विकास फाउंडेशनच्या वतीने
सकारात्मक पाऊल उचलण्यात आले.
मागील ८ वर्षांपासून एकल महिलांना उभारी देणारी परंपरा
अखंडपणे सुरू असून संस्थेच्या सदस्यांनी शुक्रवारी वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली.
गोरक्षण रोड दत्त मंदिर, दत्त कॉलनीतील एकल महिला एकत्र आल्या.
कुणाच्या पतीचे अपघातात निधन झाले, तर काहींचा घटस्फोट झाला.
काही महिलांच्या पतीने त्यांना सोडून दिले.
अशा महिलांचा हळदीकुंकू, महिलांच्या विशेष उत्सव प्रसंगी त्यांचा फारसा विचार होत नाही.
महिलांचे उत्सव म्हणजे, त्यानिमित्त एकत्र होऊन गुजगोष्टी करणे, एकमेकांचे सुख, दुःख वाटून घेण्याचे प्रयोजन.
भाव-भावनांचे आदान-प्रदान करण्याची एक व्यवस्थाच.
पण दुर्दैवाने आयुष्यात अचानक आलेल्या के संकटामुळे एकल महिला यातून वेगळ्या पडतात.
खरंतर त्यांना त्यांच्या भावना मोकळ्या करण्याचे व्यासपीठ हवे असते.
पुन्हा आयुष्य नव्याने जगण्यासाठी सर्वांनी त्यांना सांभाळून घेणे अपेक्षित असते.
हिच गोष्ट लक्षात घेऊन श्री विकास फाउंडेशनच्या विधवा, परितक्ता,
घटस्फोटिता महिलांसाठी वटपौर्णिमा उपक्रम सुरू केला.
सुरुवातीला समाजाकडून त्यांना विरोध झाला.
पण हळूहळू हा बदल परिसरात स्वीकारण्यात आला.
समजून घेणे आवश्यक
माझे पतीच्या निधनानंतर मी वटपौर्णिमा उत्सव साजरा केला.
माझ्याप्रमाणे इतर महिलांना तसे करता, यावे हाच उपक्रमाचा उद्देश होता.
एकल महिलांच्या समस्यांना समाजाने समजून घेण्याची गरज आहे.
त्यांना वेगळे न करता त्यांना सामावून घेणे आवश्यक आहे.
– वैष्णवी दातकर, अध्यक्ष, श्री विकास फाउंडेशन
Read also: https://ajinkyabharat.com/dont-ignore-mood-swings/