घाणीचे साम्राज्य : ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सस्ती येथील चित्र, प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड

घाणीचे साम्राज्य

पातूर : पातूर तालुक्यातील सस्ती गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, विद्यार्थ्यासह ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील मुख्य रस्ते, वस्ती परिसर तसेच नाल्यांमध्ये साचलेला कचरा व सांडपाणी यामुळे दुर्गंधी पसरली आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, डास व माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे ताप, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नियमित साफसफाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तक्रारी करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची बोळवण केली जात असून, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. वेळेस दखल न घेतल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तात्काळ स्वच्छता मोहीम राबवून कचरा उचलणे, नाल्यांची साफसफाई करणे व आरोग्य तपासणी शिबिरे घेणे आवश्यक असल्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

read also : https://ajinkyabharat.com/valentines-week-2026-7-important-reasons-why-promise-day-celebration-is-very-special/

Related News