पीएम श्री उर्दू शाळेच्या शिक्षकांचा शासकीय अभ्यास दौरा गुजरातकडे

पीएम

महान (प्रतिनिधी: अनिस शेख)पीएम श्री केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सात शाळांच्या शिक्षकांसाठी आयोजित शासकीय अभ्यास दौऱ्याचा उत्साहवर्धक कार्यक्रम गुजरातमध्ये सुरू झाला आहे. यामध्ये पीएम श्री जिल्हा परिषद उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळा, महान येथील शिक्षक प्रभारी डॉ. शाहिद इकबाल खान, सरफराज खान व सहायक शिक्षक अब्दुल खालिक शेख हसन यांनी भाग घेतला.

हा अभ्यास दौरा शिक्षकांना आधुनिक शैक्षणिक पद्धतींचा अनुभव देण्यास, नाविन्यपूर्ण अध्यापन तंत्रांचा अभ्यास करण्यास व इतर राज्यांतील आदर्श पीएम श्री शाळांच्या उपक्रमांची माहिती मिळविण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. अहमदाबाद व गांधीनगर येथील विविध शासकीय कार्यालये व शैक्षणिक संस्था या दौऱ्यादरम्यान शिक्षक भेट देऊन तिथल्या कार्यपद्धतींचा अभ्यास करतील.

या अनुभवामुळे शिक्षकांना विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, नवीन शैक्षणिक संकल्पना व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल. शिक्षकांनी यापुढे शाळेत अधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Related News

शाळा व्यवस्थापन व स्थानिक नागरिकांनी शिक्षकांचे उत्साहवर्धक स्वागत करत त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.

शफिक अहमद खान राही, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, म्हणाले, “पीएम श्री योजनेअंतर्गत आमच्या शाळेला मिळालेली ही संधी अत्यंत मौल्यवान आहे. अभ्यास दौऱ्याचा थेट फायदा आमच्या विद्यार्थ्यांना होणार असून भविष्यात शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्याचे प्रयत्न आम्ही करीत राहू.” 

read also :  https://ajinkyabharat.com/a-grand-welcome-given-to-dr-sugata-waghmare-who-made-anandachi-pahat-flourish-in-the-life-of-the-deprived/

Related News