पीएम मोदी पुढच्या महिन्यात युक्रेन दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर गेले होते.

त्यानंतर आत पीएम मोदी युक्रेन दौऱ्यावर जाणार आहेत.

पीएम मोदी पुढच्या महिन्यात युक्रेनची राजधानी कीवचा दौरा करणार आहेत.

Related News

दिल्लीमधील युक्रेन दुतावासाने या वृत्ताल दुजोरा दिला आहे.

पीएम मोदी या दौऱ्यात युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांची भेट घेणार आहेत.

याआधी पीएम मोदी यांनी 8-9 जुलैला रशियाचा दौरा केला.

यावेळी त्यांनी रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली होती.

भारत-रशिया वार्षिक शिखर सम्मेलनात पीएम मोदी सहभागी झाले होते.

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर पीएम मोदींचा हा पहिला युक्रेन दौरा आहे.

युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनाच्या आसपास मोदी यांचा हा दौरा होईल,

अशी सूत्रांची माहिती आहे. युक्रेनमध्ये 24 ऑगस्टला

स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. रशिया-युक्रेनमध्ये फेब्रुवारी 2022 पासून युद्ध सुरु आहे.

पीएम मोदी यांचा दौरा खूप महत्त्वाचा मानला जात आहे.

भारताचे रशियासोबतही खूप चांगले संबंध आहेत.

पीएम मोदींच्या युक्रेन दौऱ्यात रशिया-युक्रेन युद्धविरामाचा मार्ग सापडेल अशी अपेक्षा आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/grand-opening-of-paris-olympics/

Related News