“PM Kisan Yojana: शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता, लाभार्थ्यांची यादी तपासा!”

"PM Kisan Yojana: शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता, लाभार्थ्यांची यादी तपासा!"

पीएम किसान सम्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता लवकरच

देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांची मदत मिळते.

Related News

तुमचे लाभार्थ्यांच्या यादीत नाव आहे का?केंद्र सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवते.

त्यात पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना ही एक आहे.

या योजनेचा 19 वा हप्ता लवकरच देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये मिळतात.

आतापर्यंत योजनेतंर्गत 18 हप्ते कास्तकारांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.

त्यातच पुढील हप्त्याविषयीचा खुलासा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे.

पण तुमचे लाभार्थ्यांच्या यादीत नाव आहे का?

24 फेब्रुवारी रोजी 19 वा हप्ता होणार जमा

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी जमा होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहार दौऱ्यावर असतील. त्यावेळी

ते हा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करतील.

हा कार्यक्रम दुपारी 2 ते 3.30 वाजेदरम्यान होईल.

त्यावेळी ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

त्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना अगोदरच करण्यात आली आहे.

ई-केवायसी केले की नाही?

19 वा हप्ता जमा होण्यासाठी सरकारी गाईडलाईन्स जाहीर झाल्या आहेत.

पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकर्‍यांना ई-केवायसी प्रक्रिया अगोदर पूर्ण करून घ्यावी लागेल.

या नियमानुसार ई-केवायसी करणे अनिवार्य आहे.

त्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत pmkisan.gov.in या

संकेतस्थळावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.

कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळेल लाभ

पीएम किसान योजनेतंर्गत नियमात बदल करण्यात आला आहे.

या नवीन नियमानुसार, कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत

असतील तर आता एकालाच लाभ घेता येईल.

इतर सदस्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. पीएम किसान योजनेबाबत

केंद्र सरकारची नवीन नियमावली समोर आली आहे. यामध्ये अनेक बदल झाले आहेत.

तुमचे नाव यादीत आहे की नाही?

पीएम किसान योजनेचा यापूर्वी लाभ मिळाला असेल तर यावेळी लाभ मिळेल की नाही,

शेतकरी सरकारची अधिकृत साईट pmkisan.gov.in वर जाऊन त्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही ते तपासू शकतात.

Click here for more updates : https://ajinkyabharat.com/nation-wise-pahil/

 

Related News