देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पीएम
किसान सम्मान निधीचा 18 वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता
आहे. राज्यात विधानसभेचे पडघम वाजत असताना ही आनंदवार्ता
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
येऊन ठेपली आहे. राज्यात दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ
घातला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली
आहे. त्यातच आता पीएम किसानचा हप्ता जमा होण्याची शक्यता
आहे. या योजनेत दरवर्षी 6000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांना
देण्यात येतात. 2000 रुपयांच्या तीन हप्त्यात ही रक्कम जमा
करण्यात येते. आतापर्यंत या योजनेतंर्गत 17 हप्ते जमा करण्यात
आले आहेत. पीएम किसान योजनेतंर्गत 17 हप्ते जमा करण्यात
आले आहेत. आता शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याचा प्रतिक्षा आहे. या
योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत केंद्र शासनाने 34,000
रुपये दिले आहेत. तर पुढील हप्ता, पीएम किसानचा 18 वा हप्ता
हा ऑक्टोबर महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. रब्बी
हंगामाच्या अगोदर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची
योजना आहे. पीएम किसान योजनेसंबंधीच्या साईटवर उपलब्ध
माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर, 2024 रोजी
पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता जमा करतील. येत्या 5
ऑक्टोबर रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा
होण्याची प्रक्रिया सुरू होईल. रब्बी हंगामात शेती कामासाठी
लागणाऱ्या खर्चासाठी हा निधी उपयोगी ठरू शकतो.