मेधा सोमय्या यांच्याकडून तक्रार करण्यात आलेल्या
अब्रुनुकसानीच्या प्रकरणात संजय राऊत यांना माझगाव सत्र
न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं. त्यांना 15 दिवसांची कोठडी
Related News
पाकिस्तानच्या आरोपांना भारताचे चोख प्रत्युत्तर; पूरस्थितीवरून केलेला दावा फेटाळला, ‘बिनबुडाचे आरोप’ म्हणत पाकिस्तानचा बुरखा फाडला
भारत आणि पाकिस्तान...
Continue reading
माजी गृहमंत्र्यांचं महिला पोलिसांसोबत गैरवर्तन? नवनाथ बन यांचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप; ‘विनयभंगाचा गुन्हा दाखल करणार का?’
छत्रपती संभाजीनगर
Continue reading
दररोज सॅलड खाताय, पण तरीही शरीराला पुरेसं फायबर मिळतंय का? डॉक्टरांचा मोठा खुलासा; ‘या’ पदार्थांचा आहारात नक्की करा समावेश
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत
Continue reading
EPF Balance: व्याजाची रक्कम खात्यात जमा झाली की नाही? मोबाईलवरून 'या' 4 सोप्या पद्धतीने लगेच तपासा
EPF Interest Credit 2025-26: कर...
Continue reading
सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं, पण CJPचं आंदोलन सुरूच; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरून सरकारची कोंडी कायम
सामाजिक कार्यकर्ते आणि शास्त्रज्ञ सोनम वा...
Continue reading
JP Nadda Meet CJP Leaders : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर CJP ठाम; बैठकीत नेमकं काय घडलं? आशुतोष रांकांनी सांगितली Inside Story
J...
Continue reading
Share Market Crash: ट्रम्प यांच्या एका घोषणनेने जगाला हादरवले! भारतापासून युरोपपर्यंत शेअर बाजारात भूकंप, गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान
Sh...
Continue reading
सुनावण्यात आली. त्यानंतर लगोलग संजय राऊत यांच्याकडून
अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करण्यात आला. आता या प्रकरणात
संजय राऊतांना दिलासा मिळाला आहे. संजय राऊतांचा अटकपूर्व
जामीन मंजूर झाला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर संजय
राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. 30 दिवसांच्या आत वरच्या
कोर्टात अपिल करून दाद मागण्याची मुभाही कोर्टाकडून देण्यात
आली आहे. मीरा-भाईंदर महापालिकेकडून मीरा-भाईंदर शहरात
154 सार्वजनिक शौचालयं बांधण्यात आली. त्यापैकी 16
शौचालयं बांधण्याचं कंत्राट भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या
पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट
कागदपत्र सादर करुन मेधा सोमय्या यांनी मीरा-भाईंदर पालिका
अधिकाऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप संजय राऊत यांनी
केला होता. या प्रकरणाच्या सुनावणी झाली. यात संजय राऊतांना
15 दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मेधा सोमय्या यांनी
त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना कोर्टात आव्हान दिलं
होतं. या खटल्याचा निकाल सोमय्या यांच्या बाजूने लागला. संजय
राऊत यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली. आता त्यांचा जामीनही
मंजूर झाला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/maharashtra-has-never-seen-such-an-inefficient-chief-minister-aditya-thackeray/