नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जून अखेरीस शेतकऱ्यांच्या
खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, या योजनेचा लाभ वेळेत मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांनी
30 मेपूर्वी ई-केवायसी आणि बँक खात्याशी आधार लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, यावेळेसचा हप्ता थांबू शकतो.
Related News
“भारताच्या सहकार्याबद्दल आम्ही ऋणी आहोत”
“भारताविरुद्ध कट रचणाऱ्या अल्पवयीनाची गुजरातमधून अटक;
“मला 2 कोटी मागितले अन् वैष्णवीचा जीव गेला!”
भारतात पुन्हा कोरोनाचा फैलाव,
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ!
पाकिस्तानसाठी काम करत होते, ज्योती मल्होत्राची मोठी कबुली;
कोकणात मुसळधार पावसाचा कहर!
केदारनाथ ते देहरादूनपर्यंत पावसाचा इशारा!
मान्सूनची चाहूल! राज्यात प्री-मान्सूनची जोरदार हजेरी,
पावसामुळे मुंबई इंडियन्सचे स्वप्न भंगणार?
उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामावर शिवसेनेचे तीव्र आंदोलन;
गौसेवेचा संकल्प घेत विद्यार्थ्यांनी अनुभवले गोमातेचे महत्त्व
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक सहाय्य दिलं जातं,
जे तीन समान हप्त्यांमध्ये थेट खात्यात जमा होतं. आतापर्यंत 19 हप्ते वितरित झाले असून आता 20व्या हप्त्याकडे लक्ष लागले आहे.
ई-केवायसीसाठी पर्याय :
-
pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करून स्वयं ई-केवायसी करा
-
PM-Kisan मोबाईल अॅपद्वारे फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी
-
CSC सेंटरवर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा
बँक खात्याशी आधार लिंक करणं अनिवार्य :
जर बँक खात्याशी आधार लिंक नसेल, तर फसवणूक टाळण्यासाठी तुमचं नाव लाभार्थी
यादीतून वगळलं जाऊ शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने बँकेत जाऊन आवश्यक कागदपत्रांसह लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करावी.