पातूर येथील आयुर्वेद रुग्णालय आता आरोग्य योजनेच्या कक्षेत
पातूर प्रतिनिधी | दि. 6 फेब्रुवारी 2025
पातूर : आमदार डॉ. राहुल पाटील शैक्षणिक संकुलाच्या अंतर्गत येणारे नलिनीताई राऊत ग्रामीण आयुर्वेद रुग्णालय
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
लवकरच महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या कक्षेत समाविष्ट होणार आहे.
यामुळे या भागातील रुग्णांना मोठा लाभ मिळणार आहे.
गुरुवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या कक्षात झालेल्या बैठकीत शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीस जिल्हाभरातील सर्व रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पातूर येथील आयुर्वेद रुग्णालयाने केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव यावेळी शल्य चिकित्सक तुरुंग तुषार वारे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी बी. बी. गाढवे यांनी केला.
प्राथमिक आरोग्य केंद्र, पातूरच्या कक्षेत येणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया या आयुर्वेद रुग्णालयात पार पडतात आणि त्यांचे सहकार्य उत्कृष्ट असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी या रुग्णालयासाठी शासनाच्या सर्व योजना लागू करण्यासाठी आवश्यक ते सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या सामाजिक शिबिराचा अहवाल रुग्णालयाचे प्रतिनिधी धनंजय मिश्रा
यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याकडे सादर केला.
या शिबिराच्या आयोजनात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री काटोले, उपप्राचार्य अभय भुस्कडे, शिबिर समन्वयक सुनिता कदम,
रुग्णालय अधीक्षिका गायत्री मावळे आणि उपअधीक्षक अब्दुल वसीम यांनी मोलाचे योगदान दिले.
शासनाद्वारे या शिबिराला नुकतेच सन्मानित करण्यात आल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले.
महाविद्यालयाचे संचालक डॉ. साजिद शेख यांनी यावेळी सांगितले की
“केंद्र व राज्य शासनाच्या अटी व शर्ती पूर्ण करून लवकरच पातूर येथील आयुर्वेद रुग्णालय महात्मा फुले जन आरोग्य योजना,
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या कक्षेत आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य कार्यक्रमांमध्ये रुग्णालयाने आपली भूमिका निभावली आहे,
त्यामुळे भविष्यात शासनाच्या या योजना लागू झाल्यास मोठ्या शस्त्रक्रिया देखील पातूर येथील रुग्णालयातच पार पडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.